डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार बाबा राम रहिमला तुरुंगात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप जामिनावर सुटलेल्या एका कैद्याने केला आहे. राम रहिमला तुरुंगात सर्व सुख सोयी उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचा दावादेखील कैद्याने केला आहे. हरयाणातील रोहतक तुरुंगात राम रहिम बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत आहे. याच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेला कैदी राहुलने राम रहिमबद्दल काही खळबळजनक दावे केले आहेत.
'तुरुंगातील इतर कैद्यांकडून नियमाप्रमाणे कामे करुन घेतली जातात. मात्र तुरुंगातील एकाही कैद्याने बाबा राम रहिमला काम करताना पाहिलेले नाही. राम रहिमला इतर सर्व कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात येते. त्याला सर्व सुविधा दिल्या जातात,' असा दावा राहुलने केला
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews